“येथे बलात्कारासाठी बाई हवी आहे… कोणतीही चालेल!”©® - अविनाश भिमराव ढळे - All rights reserved सभ्यतेचे, संस्कृतीचे, सक्षम न्यायव्यवस्थेचे दावे करणाऱ्या या देशात एखादा प्रश्न अजूनही धगधगत राहतो स्त्रीच्या सुरक्षिततेचा. आज ज्या सहजपणे आपल्याला बलात्काराच्या बातम्या वाचायला मिळतात, त्या इतक्या दैनंदिन झाल्या आहेत की जणू त्या समाजाच्या जीवनाचा भागच बनून गेल्या आहेत. याच वास्तवाला एक प्रखर व्यंग्यात्मक चपराक देईल असा प्रश्न उभा राहतो “येथे बलात्कारासाठी बाई हवी आहे…!कोणतीही चालेल!”