जितवण पळाले- भाग 4

  • 1

     जितवणीपळाले- भाग ०४                   जीतवण्याच्या  सभोवताली जांभ्या दगडाचे कातळ असले  तरी  उभ्या कड्यात काळवत्र  भरलेले होते.  कड्याची उंची  दहाबारा पुरुष सहज भरली असती.पाणवठ्याचा शंभरेक  फूट  भाग सोडून  त्यापलिकडे   कड्याचा भाग खोदून  काळवत्री खडी  मिळू  शकेल. या  भागातून   अगदी अल्प खर्चात  कच्चा रस्ता करून खडीची वाहातुक करता येईल  असाअंदाज  सर्व्हेअर  सायबाला आला त्याप्रमाणे त्याने  आपला अहवाल तयार केला.  पंधरा दिवसानी  रस्त्याचा सर्वे करून  त्या प्रमाणे मार्किंग करून झाल्यावर  साहेबाचा तळ उठला. सर्वे रिपोर्ट गेला आणि महिनाभरातच मंजुरी आली. अनंतरावाचे साड भाऊ शंभूराव  दळवी जिल्हा परिषदेची लहान मोठी कंत्राट घेत. रस्त्याचं  काम  मोठं होतं. त्यानी अनंतरावांशी टाळी मारून टेंडर भरलं. एवढं मोठं काम करायची हिंमत असणारा कंत्राटदार  जिल्ह्यात कोणीचनव्हता. शंभूरावानी  सगळ्या  गोष्टी पद्धतशीर