त्या बंडखोर चमूच्या ५ तबकड्या आता हळूहळू त्या निळ्या हिरव्या ग्रहाच्या जवळ जाऊ लागल्या. त्यांच्या दुर्बिणीतून त्यांनी एक दृश्य पाहिले आणि त्यांच्या आनंदाला उधाण आले. जो निळा रंग त्यांना अवकाशातून दिसत होता तो रंग म्हणजे पाणी होते. पाणी आले म्हणजे जीवसृष्टी आली. त्यांना आता आणखीन उत्सुकता लागून राहिली होती. पण त्याहून जास्त आनंद त्यांना या गोष्टीचा होता की या ग्रहावर पाणी होत. कारण हे लोक पाण्यात राहू शकत होते. यांचा स्वतःचा ग्रहच ९०% पाण्याने बनलेला होता. हे प्रगत लोक जलचर नाही तर उभयचर होते. या ग्रहावर पाणी आहे ते ही विपुल प्रमाणात त्यामुळे यांना फायदाच फायदा होता.थोडे आणखी जवळ गेल्यावर