जितवण पळाले- भाग 3

                                       पोटं तटम्म फुगल्यावर तिथेच कडेलाचिखलटीत लोळत पडली. त्याच दरम्याने सुकती  लागली नी   सुस्त झालेली डुकरं  रुपणीत अडकून पडली.  गावातली ढोरं सुद्धा असंख्य वेळा  अंदाजचुकला की  रुपणीत अडकत असत. रुपणी कमरभरखोल होत्या. ढोरांचे पाय  चिखलात फसत पण  पोटवळाचा भाग पृष्ठभागावर उपेवत राही.  आपण फसलो हे लक्षात आल्यावर  मग़ ढोरं पाय फाकवून  तशीच निपचित पडूनरहात.  अगदी लहान वासरं सुद्धा  रुपली तरी  पोटवळाचा भाग वरच उपेवत राही.घाबरलेली वासरं हंबरून हंबरून हैराण व्हायची. पण त्या चिखलडीत पुढे जावून त्यानाबाहेर काढणं महाकर्म कठिण होतं. दीड दोन तासानी भरती लागली  नी  चिखलवटीच्या भागात पाणी