मनोपदेश

  • 228
  • 1

प्रिय वाचकहो, मनोपदेश - मनाचे श्लोक' या समर्थ रामदास स्वामींच्या अतुलनीय ग्रंथाचा भाग  आपल्या हाती देताना मला विशेष आनंद होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाडी ग्रंथ महर्षी, जसे की अगस्त्य, भृगु, अत्री आणि अन्य यांच्या दिव्य मार्गदर्शनाने प्रेरित होऊन, प्राचीन भारतीय ज्ञान आणि आध्यात्मिक विचारांचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली. या प्रेरणेतूनच, आजच्या वेगवान आणि ताणतणावाच्या जीवनात मनाला शांती आणि योग्य दिशा मिळावी या उद्देशाने, 'मनाचे श्लोक' या ग्रंथाला नव्या स्वरूपात आपल्यासमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत 'मनाचे श्लोक' केवळ मराठीत वाचले जात होते. पण 'मनोपदेश'ने ती मर्यादा ओलांडून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये त्यांचा अर्थ आणि संदर्भ