या फाईलमध्ये माझ्या काही अटी आहेत.त्या पूर्ण केल्याशिवाय Smart Culture Hub Project त्याच्या नावावर जाणार नाही.या अटींपैकी शेवटची अट... अभिराजला मान्य करावी लागेल.”आता पुढे.......अभिराजने फाईल हातात घेतलीबाकी सगळेजण एकमेकांकडे पाहत होते.श्रीराम मात्र हळू आवाजात म्हणाले “कधी कधी वारसा मिळवण्यासाठी रक्ताचं नातं पुरेसं नसतं… मन, धैर्य आणि दृष्टिकोनही लागतो.अभिराजने फाईल उघडली. काही पानं पलटली आणि शेवटच्या पानावर लिहिलेली ओळ वाचताच त्याचा चेहरा बदलला.त्याने चष्मा काढून बाजूला ठेवला. ओठ घट्ट मिटले.> “अंतिम अट... अभिराजने पुढील ६ महिन्यांत लग्न केल्यासच Smart Culture Hub प्रोजेक्ट आणि सर्व अधिकार त्याच्या नावावर होतील.”क्षणभर हॉलमध्ये शांतता पसरली.“काय?” अभिराज चिडून उठला.“Baba, ही काय अट आहे? माझं काम, माझी जबाबदारी,