जितवण पळाले- भाग 2

  • 228
  • 63

                                                 गोड्या पाण्याचीटंचाई  असली तरी  गाव सधन होता. मळ्याच्या कडेने आंग ओलीवर  बिनशिपण्याचे माड  नारळानी ओथंबलेले असायचे.एकेका माडापर  दीड दोनशे  नारळ लागलेले दिसायचे . खाऱ्या पाण्याचा उग्रम असल्यामुळे  कोंड सखलातल्या नारळाचं खोबरं गोडूस लागायचं. मंगळवारी दांड्यातला बाजार नी शुक्रवारी पठारातल्या  बाजाराला  कोंड सखलातले लोक नारळ विकायला  जात. त्यांच्या नारळावर गिऱहाईकं नुसती तुटून पडायची. नारळाचं बेफाट उत्पना असल्यामुळे कोंड खोलात  प्रत्येक वाडीत तीन चार तरी तेलाचे घाणे असायचे. खाडीच्या कडेला उंडिली नी करंजाची झाडं माजलेली होती.मळ्यात  उन्हाळी भुईमूग  व्हायचा. ढोरं कायम मोकाट सोडलेलीअसल्यामुळे  पिकदाऊ   मळ्यात जायला   एक वाट  ठेवून भोवती वावभर  रुंद चर खणलेले असत. माऱ्याच्या