जितवण पळाले- भाग 1

  • 1

दांडे  निवती वरून दर्याचा एक फ़ाटा पठार, तरवड आणि कोंड सखला पर्यन्त गेलेला आहे. निवतीवरून तरवडातल्या जुगाईच्या देवळापर्यंतगाडी रस्ता होता.  दिवसातून तीन चारएस्ट्या   असायच्या. पण  पुढे कोंड सखलात जायचं तर चालसूर माणसालाही दीड घंटा वेळ लागायच्या. तरवडच्यावेशीकडे गेलं की समोर माडभरापेक्षा खोल उतरती  घसारीची वाट होती.  दरडीच्या कडेने  जेमतेम बैल गाडी  घालता  येईल इतपत चाकोरी होती. पायथ्याला   सवथळ भाग गाठी पर्यंत   मोडणा मोडणानी  बैल गाडी नेता