मंगळाचे दोन चंद्र, त्यापैकी एक मंगळ ग्रहापासून कमी अंतरावर पण प्रचंड वेगाने फिरत होता तर दुसरा खूप लांबून आणि कमी वेगात फिरत होता. नव्याने आलेले शास्त्रज्ञ त्या चंद्रावर जाण्यास उत्सुक होते पण जवळच्या चंद्रावर जाणाऱ्या चमूत त्यांना स्थान नाही मिळालं. १० तबकड्यांचा समूह मंगळ ग्रहाच्या जवळच्या चंद्रावर फोबॉसवर जायला निघाल्या. वरिष्ठ शास्त्रज्ञांची मनमानी खूप झाली होती. सगळ्या ठिकाणी सगळ त्यांचेच ऐकायचे असा नियम त्यांनी बनवला होता. नव्याने आलेल्या शास्त्रज्ञांना काहीही करण्यापासून रोखले जात होते. त्यांची सतत अवहेलना आणि अपमान सुरू होते. युरोपावर जीवसृष्टी सापडल्याने वरिष्ठ शास्त्रज्ञांना अहमपणा आला होता. त्यांच्या अहंकारी वागण्याला हे नवीन शास्त्रज्ञ कंटाळले होते. त्यातच फोबॉस वर जायला