सायली आणि निशात…निशात हा खूप साधा-सरळ मुलगा. कुणालाही उगाच एक शब्दही न बोलणारा, कुणाशी काहीच न सांगणारा. स्वतःचे काम शांतपणे करत राहणे हा त्याचा स्वभाव.आणि दुसरीकडे…सायली अगदी मनमिळावू, बोलण्यात हुशार. कुणालाही उलट उत्तर न देणारी, पण तिला कुणी काही चुकीचे बोलले तर त्यालाच तिथल्या तिथे योग्य उत्तर देणारी अशी ती मुलगी.नमकी गोष्ट सुरू होते अशी की, निशांत हा काही कामानिमित्त पुण्यातून बाहेर गेलेला असतो. छोटंसं गाव असतं. तो तिथे सोलार पॅनेलचा इंजिनिअर म्हणून गेलेला असतो. एका छोट्या शाळेत त्याला ते बसवायचे असतात.तो मध्यरात्री तिथे पोहोचतो. जवळपास कुठे राहायची सोय नसते—हॉटेल नाही, बस स्टॉप नाही, अगदी साधं झाडाखाली बस थांबते इतकंच.