भारतीय सैन्याच्या इतिहासात १३ एप्रिल १९८४ हा दिवस एक अमर क्षण ठरला. त्या दिवशी सुरू झालेल्या “ऑपरेशन मेघदूत” या मोहिमेने जगातील सर्वात उंच रणभूमी सियाचिन ग्लेशियर भारताच्या ताब्यात आली. या मोहिमेने भारताने केवळ आपली सीमारेषा सुरक्षित केल्या नाहीत, तर देशाची सैनिकी ताकद आणि जिद्द जगासमोर दाखवून दिली.सियाचिन ग्लेशियर हा कराकोरम पर्वतरांगांमध्ये, लडाखच्या उत्तरेकडे स्थित आहे. येथे समुद्रसपाटीपासून सुमारे २०,००० फूट उंचीवर थंडी इतकी प्रखर असते की तापमान -५० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते. जगातील सर्वात उंच आणि थंड ठिकाण असल्यामुळे तिथे राहणे किंवा लढणे हे मानवासाठी जवळजवळ अशक्य वाटावे असे आहे. पण हेच अशक्य भारतीय जवानांनी शक्य करून दाखवले.१९४९ साली भारत-पाकिस्तान