आत्ममग्न मी... - 3

( टीप: हा भाग वाचल्या नंतर किंवा वाचण्याच्या आधी या भागाच्या आधीचा भाग नक्की वाचा )भाग : 3Happiness is a choice....आयुष्य किती सुंदर आहे नाही? आयुष्य जगत असतांना किती साऱ्या गोष्टी आपण शिकत असतो, बघत असतो. नात्यांचा अनुभव घेत असतो. नवीन गोष्टीचा सतत अनुभव घेत जाण किती सुखदायक असत. पहिले थोड अवघडल्यासारखं नक्कीच वाटत पण नंतर किती एकरूप होऊन जातो आपण काही गोष्टीशी खुप जास्त समाधानी असल्यासारख वाटत काही वेळा, तो आनंद आपण स्वतः साठी शोधलेला असतो. दुसरं कुणाला सांगताही येनार नाही येवढं काही आपण नवीन गोष्टींशी जुळवून घेण्यावा प्रयत्न करत असतो.नवीन गोष्टी शिकत जाणं हा खरोबरचं खुप सुखदायी क्षण असतो.