श्रीमद् भागवत -१जे लोक अनेक समस्यांनी त्रासलेले असलेले असतात, ज्याना पैसे कमी पडत असतात किंवा ज्यांना कोणत्याही कारणांनी भगवंताविषयी जिज्ञासा उत्पन्न होते असे लोक भक्ती मार्गात पाऊल ठेवतात. भगवंताविषयी ज्ञानाचा प्रसार तसेच नामाचा प्रसार करणारे भगवंताला प्रिय असतात. जे लोक सतत काही वासना, इच्छांच्या मागे लागून भोग विलास करण्यात मग्न असतात आणि नंतर सुख मिळत नसल्यामुळे दुःखी होत असतात, आपल्या इंद्रीय सुखासाठी कोणत्याही थराला जाऊन चुकीची कामे करण्यात मग्न झालेले असतात , आणि त्यामुळे त्यांना दुःख, संकटांना सामोरे जावे लागते. ज्ञान असूनही भगवंता बद्दल नीट आकलन झालेले नसल्याने जे दुःखी राहतात. तसेच काही लोक स्वतःला नास्तिक म्हणून घेणारे असतात, गैर कृत्य करण्यात