भाग - ११दुसऱ्या दिवशी पेडणेकर कुटूंब आणि कुलकर्णी कुटूंब एकत्र जमले, सगळे आंनदी होते...अर्जुनाच्या आत्याची वाट पाहत होते...तेवढ्यात बाहेरून कारचा आवाज आला...तस सगळे अंगणात गेले...कार मधून त्यांची आत्या उतरली.(तुळजा)कॉटनची सफेद साडी नेसलेली...केसांचा जुडा बांधलेला....चेहरा निखळ, तेजस्वी जणू देवीचे रूप...अर्जुन - आत्या कशी आहेस...(मिठी मारताना म्हणाला )तुळजा - मी एकदम मस्त अर्जुना तू कसा आहेस?अर्जुन - मी पण मस्त आत्या..अपूर्व - नमस्कार करतो आत्या, (पाया पडताना म्हणाला)तुळजा - अप्पू, पूर्ण खाली वाक आणि परत नमस्कार कर....अपूर्व - बर पुन्हा नमस्कार करतो आत्या...तुळजा - ह्म्म्म सदासूखी रहा :आई बाबा नमस्कार करते..भाऊसाहेब - असुदे बाळा, सुखी रहा :भागीरथी- सुखी रहा बाळा...संगीता - ताई