अनुबंध बंधनाचे. - भाग 49

अनुबंध बंधनाचे.....( भाग ४९ )वैष्णवी दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून ऑफिसला गेली. तिचा भाऊ संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिला स्टेशनला भेटणार होता. आज तिला मोबाईल घ्यायचा होता. त्यामुळे कधी दिवस संपतोय असे तिला झाले होते. अखेरीस कसाबसा दिवस निघून गेला होता, संध्याकाळचे सहा वाजले होते. ती ऑफिस मधुन निघते आणि पीसीओ वरून दादाला कॉल करते. तो स्टेशनला येऊन थांबलेला होता. त्यामुळे ती प्रेमला कॉल करत नाही. तिथून ती स्टेशनला येते. तिथे तिचा भाऊ तिला भेटतो. ते दोघे तिथेच एका मोबाईलच्या शॉप मधे जातात. ती नोकियाचा एक मोबाईल पसंत करते. तिथेच त्यामधे नवीन सिम कार्ड टाकून घेते. काही वेळाने ते कार्ड चालु होणार होते. तिचा