डेथ स्क्रिप्ट - भाग ३अध्याय १ ----------------विस्मृतीचा अंधार---------------------अंतिम लढाईनंतरचा तो क्षण. कारखान्याच्या तळघरातून बाहेर पडल्यानंतर, नैनितालच्या त्या गोठवणाऱ्या थंड हवेत डॉ. फिनिक्स, कर्नल विक्रम सिंग आणि रिया मल्होत्रा एका नव्या, अधिक भयावह प्रवासासाठी तयार होते. निशाचा मृतदेह ताब्यात घेऊन आणि तळघरातील तो गोंधळ मागे सोडून, विक्रमने त्वरित पुढची कृती केली.डॉ. फिनिक्स आणि रियाला घेऊन तो त्याच्या अत्याधुनिक लष्करी व्हॅनमध्ये (Military Van) बसला. त्याचे कमांडो पण दुसऱ्या गाडीमध्ये बसले. आर्यन शर्मा 'क्रोनोस' चा बनावट प्रोटोटाइप घेऊन पळून गेला होता, पण विक्रमच्या हातात असलेला 'अंतिम कोड' हे त्यांचे एकमेव आशास्थान होते.विक्रम गाडी चालवत असताना त्याचे डोळे सतत मागील आरशातून डॉ. फिनिक्सकडे जात होते. डॉ.