न सांगितलेल्या गोष्टी

(75)
  • 1.6k
  • 627

जीवनात जसं आपण विचार करतो तसं कधीच होत नाही; काहीतरी वेगळंच होतं. तसंच काहीसं माझ्या सोबत झालं.तिला भेटण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी, मनामध्ये तिच्याबद्दल काय आहे ते सांगण्यासाठी मी तिच्या शहराला गेलो होतो.प्रवास आठ तासांचा होता, पण त्या पूर्ण प्रवासात — तिला कसं बोलायचं, काय बोलायचं, सुरुवात कुठून करायची, इतक्या वर्षांनी भेटतोय म्हणून ती ऐकल्यावर काय बोलेल, तिचं उत्तर काय असेल, ती माझ्या मनातील भावनांची कदर करेल का, तिला माझ्या भावना समजतील का — अशा अनेक प्रश्नांनी मला भांबावून सोडलं होतं.मी माझ्याच कल्पनांमध्ये हरवून गेलो होतो. त्या गोड स्वप्नांमध्ये मी खूप काही विचार केलं होतं, पण तसं काही झालंच नाही.मी तिच्या शहरात