1971 चं भारत-पाकिस्तान युद्ध संपल्यानंतर देशभर आनंद आणि अभिमानाचं वातावरण होतं, पण काही भारतीय सैनिक अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होते. त्यांच्यात भारतीय वायुसेनेचे तीन तरुण अधिकारी, फ्लाइट लेफ्टनंट दिलीप पारुळकर, एम.एस. ग्रेव्हल आणि हरीश सिंहजी या तिघांची कहाणी आजही धैर्याचं प्रतीक मानली जाते. युद्ध संपलं, तरी त्यांच्या लढाईचा शेवट झाला नव्हता. ती लढाई होती स्वातंत्र्यासाठी तुरुंगाच्या भिंतीच्या आतून, मृत्यूच्या सावलीतून, जिवंत राहून भारताकडे परतण्याची.ही कहाणी सुरू होते 1971 च्या युद्धात, जेव्हा भारतीय वायुसेनेच्या हल्ल्यादरम्यान दिलीप पारुळकर यांचं विमान पाकिस्तानमध्ये कोसळलं. ते जिवंत राहिले, पण शत्रूच्या ताब्यात गेले. काही दिवसांनी एम.एस. ग्रेव्हल आणि हरीश सिंहजी हेही ताब्यात घेतले गेले. तिन्ही अधिकाऱ्यांना