आई आपल्या मुलीला आज्जीबद्दल सांगत आहे.“ऐक ग, ही फक्त आज्जीची कथा नाही… तिच्यासारख्या अनंत स्त्रिया होऊन गेल्या ,घडत आहेत,काही लढत आहेत काही माघार घेत आहेत. त्या सर्वांची आहे.“आई, तुझी आज्जी कशी होती?”तू विचारलंस तेव्हा, मी गप्प झाले.उत्तर देण्यापेक्षा तिच्या आठवणींनीच पहिल्यांदा माझा हात धरला.“बाळा, ही कथा नाही… ही व्यथा आहे.पण घेण्यासारखं खूप आहे. ते मात्र नीट घे.”एक आटपाट नगर होतं.तिथे राहत होता एक ‘राजा माणूस’.गादी नाही, पण गुणांचा राजाहुशार, हरहुन्नरी, हाताच्या रेषांसारखा चलाख.त्याला होत्या दोन बायकाएक आवडती.एक नावडती.आणि नावडती?आपली आज्जी बरं का.आई,"आवडत नव्हती तर कशाला लग्न केले? पूर्वी अशीच परंपरा होती ,दुसरी बायको आली की पहिली आपसुकच नावडती होते.तिने कधी कोणाचा द्वेष