तेजसचा तेजस्वी करार

भारताच्या संरक्षण क्षेत्रात अभिमानाचा एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक (GE) कंपनीसोबत तब्बल एक अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. या कराराअंतर्गत HAL ला 113 अत्याधुनिक जेट इंजिन्स मिळणार असून, ते देशात तयार होणाऱ्या तेजस Mk1A फायटर जेट्सना शक्ती देतील. या कराराची किंमत सुमारे ₹8,868 कोटी असून, तो भारताच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला मोठा आधार देणारा ठरला आहे.तेजस हे भारतात संपूर्णपणे विकसित केलेले लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. हलके, वेगवान आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हे विमान आता भारतीय हवाई दलाचे प्रमुख बळ ठरत आहे. HAL आणि DRDO यांनी दशकभराच्या