उगवतची आज्जी - 3 (अंतिम भाग)

                सुधाआत्तेचे लग्न होण्याआधीच उगवतचे आजोबा निवर्तले. मृत्युच्या आदल्या दिवशी  बापुनी त्याना मघई पान नी  सुपारीचा चुरा तळहातावर चांगला मळून दोन तंबाखुची पानं टाकून ते भरवलं. पानाचा रस गळ्यातून उतरल्यावर त्यानी  “कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ” हा पूर्ण श्लोक म्हटला नी श्रीकृष्ण  गोविंद हर मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हा जप  सुरू केला. दुसरे दिवशी पहाटे सुधा आत्तेच्या हाका ऐकून बापू नी आई  उगवतच्या घरी गेले. तेंव्हा आजोबांचं प्राणोत्क्रमण झालेलं होतं. ते गेल्यावर सहा महिन्याने सुधा आत्तेचं लग्न झालं नी आज्जी एकटीच राहिली. मग आम्ही भावंडं रोज रात्री तिच्या सोबतीला नी झोपायलाच उगवतच्या घरी