रशियाने अंटार्क्टिक खंडात प्रचंड तेलसाठा सापडल्याचा दावा केला आहे आणि या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या शोधामुळे केवळ उर्जाक्षेत्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणातही नवीन ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण अंटार्क्टिक हा पृथ्वीवरील एकमेव खंड आहे जिथे कोणत्याही देशाला स्वामित्वाचा अधिकार नाही. तो “Antarctic Treaty System” या आंतरराष्ट्रीय कराराने संरक्षित आहे. तरीही रशियाच्या या हालचालीमुळे ऊर्जा, पर्यावरण आणि भू-राजकारण या तिन्ही पातळ्यांवर जगभरात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.रशियाच्या संशोधन जहाजांनी अंटार्क्टिकातील वेडेले सागराच्या परिसरात केलेल्या भू-वैज्ञानिक सर्वेक्षणातून सुमारे 511 अब्ज बॅरल्स इतका तेलसाठा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा आकडा इतका मोठा आहे की, तो संपूर्ण