साल १९७१, भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव शिगेला पोहोचला होता. पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश) नागरिकांवर अन्याय चालू होता. लाखो निर्वासित भारतात शिरले होते. युद्ध जवळ आलं होतं. पण या युद्धाचं एक महत्त्वाचं रणांगण होतं ते म्हणजे समुद्र.भारताकडे त्या वेळी INS विक्रांत ही मोठी विमानवाहू नौका होती. ही नौका म्हणजे भारताच्या नौदलाची सर्वात मोठी ताकद होती. पाकिस्तानला माहिती होतं की विक्रांतचा नाश केला, तर भारताची समुद्री शक्ती मोडेल. म्हणून त्यांनी एक गुप्त मोहीम आखली ‘ऑपरेशन गाझी’.ही मोहीम पार पाडण्यासाठी पाकिस्तानने आपली जुनी पण प्रभावी पाणबुडी PNS गाझी पाठवली. तिचं उद्दिष्ट एकच होतं — विक्रांतचा शोध घेऊन त्याला उडवून देणे. गाझीचे कमांडर