उगवतची आज्जी - 2

  • 81
  • 1

       तेवढ्यात हवेतून शब्द आले, “महाराज, या रोपांच्या सभोवती खोदून आम्हाला बाहेर काढा.” कामगारानी सावधपणे खोदकाम करून लहुतटू नी मधुराणी दोघानाही अलगद बाहेर काढलं. कोषाध्यक्षांकडून सुवर्णमुद्रा  घेतल्याचं  दुष्ट राणीचं बिंग फुटलं. तिला नी दासीना सुळावर चडवण्यात  आलं. गोष्ट संपली नी आम्ही झोपी गेलो. त्यानंतर रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर कुणीतरी म्हणायचा,“ लहुतटू लहुतटू  गोष्ट कोण सांगतय्?” त्यावर सगळे एकसुरात म्हणायचे. “आजी सांगतेय्....” उगवतची आजी ही आमची चुलत चुलत आजी. तिचं घर आमच्या वाड्याच्या पलिकडच्या पडणात, पूर्व दिशेला. म्हणून ती उगवतची आज्जी. तसं गावात सुद्धा आम्हाला वडाखालचे साने नी विठू आजोबाना उगवतचे साने म्हणत. विठू आजोबा नी रुक्मिणी आज्जी दोघंही