गाझा पट्टी पुन्हा एकदा युद्धाच्या ज्वाळांनी वेढली गेली आहे. हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत, शहरांची राख झाली आहे आणि मानवी वेदना आजही त्या भूमीवर दररोज दिसून येतात. या सगळ्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक नवा प्रस्ताव पुढे आणला आहे, गाझामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता राखणारे दल तैनात करण्याचा. हे दल संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली दोन वर्षांसाठी कार्य करेल आणि या काळात गाझाची पुनर्बांधणी, प्रशासन आणि सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या योजनेला पाठिंबा देत, याला त्यांच्या मध्यपूर्व धोरणाचा दुसरा टप्पा म्हटले आहे. या योजनेचा उद्देश गाझामध्ये दीर्घकालीन स्थैर्य निर्माण करणे आणि पुन्हा संघर्ष उभा राहू नये यासाठी ठोस यंत्रणा तयार