टाॅक्सिक

“नील,” मी अलगद म्हणाले, “आपण असं रोज का भांडतो?”तो मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत होता, नजरही न उचलता म्हणाला,“तूच सांग, कारण तू बदलली आहेस.”तीच वाक्य पुन्हा.दरवेळी तसंच, दोष माझाच.कधी काळी तो ‘आपण’ म्हणायचा, आता फक्त ‘तू’.आमचं नातं सुरू झालं तेव्हा, प्रत्येक क्षणात कोवळं प्रेम होतं.कॉफीचा कप, रात्रीचा चंद्र, आणि दोन जीव एकमेकात हरवलेले.त्याच्या बोलण्यात ती शांतता होती जी मी वर्षानुवर्षं शोधत होते.तो माझ्या डोळ्यांत पाहायचा आणि म्हणायचा,“तू माझं घर आहेस, विभा".तुझ्यात मला सुकून मिळतो.हो, मी घर होते, पण हळूहळू मीच कैद बनत गेले.सुरुवातीला त्याचं “काळजी घेणं” गोड वाटायचं.“इतका वेळ बाहेर राहू नको,” “कोणाशी काय बोलतेस?”“मला तुझी चिंता वाटते".ही वाक्यं प्रेमासारखी वाटायची.पण