********८****************** शिलाचा संसार व्यवस्थित चालला होता. कारण होतं, तिच्यावर झालेले संस्कार. तिच्यावर तिचे आईवडील गरीब असूनही चांगले संस्कार केले होते. ज्यातून तिचे आईवडील जरी बौद्ध बनले तरी त्यांनी तिच्यावर चांगलेच संस्कार केले होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा शिलाला तोंडपाठ होत्या. ज्यात मी देव मानणार नाही व चमत्काराला स्थान देणार नाही, अशी गृहितके लिहिली होती. ज्यातून शिलाच्या विचाराला दिशा मिळाली होती. ज्यातून इतरही लोकांनी दिशा घेतली होती. परंतु काही लोकं त्या गृहितकानुसार व संविधानानुसार चालत नव्हते. बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा नक्कीच घेतल्या होत्या. परंतु सोडचिठ्ठी वा घटस्फोटाला प्राधान्य दिलं नव्हतं. मंगलसुत्र