रेशीमगाठ

आज तिचा वाढदिवस होता. तिच्या हट्टामुळे घरातल्या घरातच वाढदिवस सेलिब्रेट करायचा ठरला. ती तिच्या आई वडिलांकडे काही स्पेशल मागणार होती. त्यामुळे ती थोडी नर्व्हस होती.केक कट करण्याची वेळी झाली अजून ती आली नव्हती म्हणून तिचा भाऊ नचिकेत तिला बोलवायला गेला."अनु... इथे काय बसली आहेस... चल केक कट करायचाय ना... सगळे वाट बघतायत तुझी"नचिकेत"हो"अनु"हो काय हो... माझ्यासोबत चल... नाही तर परत इथेच बसून राहशील..."नचिकेतती त्याच्यासोबत निघाली."मस्त नेहमी सारखं बाहेर गेलो असतो सेलिब्रेट करायला तर... तुझा हट्ट की या वेळी बर्थडे घरातच करायचा..."नचिकेत"नची... मिळेल ना मला हवं ते..."अनु"मी काय बोलतोय... तुझं काय मध्येच..."नचिकेत"सांग ना"अनु"नको टेन्शन घेऊस... तुला हवं ते मिळेल तुला... आपले