पूर्व युक्रेनमधील पोक्रोव्ह्स्क हे शहर सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. येथे सुमारे दहा हजार युक्रेनी सैनिक रशियन सैन्याच्या घेरावात अडकले आहेत. युद्धाच्या या निर्णायक टप्प्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी अचानक शांततेसाठी चर्चेला तयार असल्याचे जाहीर केले. “रशिया किंवा बेलारूस वगळता कुठेही आम्ही चर्चेसाठी तयार आहोत,” असे ते म्हणाले. या एका वक्तव्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात हलकल्लोळ माजला. झेलेन्स्कींचा हा प्रस्ताव खरोखर शांततेचा मार्ग आहे का, की केवळ श्वास घेण्यासाठीची तात्पुरती विश्रांती? हाच सध्या सर्वांचा प्रश्न आहे. युद्धाच्या सुरुवातीला जगाने पाहिले की, युक्रेनने एका मोठ्या शक्तीला तगडा प्रतिकार दिला. परंतु तीन वर्षांच्या सततच्या लढाईनंतर परिस्थिती वेगळी आहे. रशियाने डोनेट्स्क प्रदेशाचा