सुधारक नावाच्या पुस्तकाविषयी सुधारक नावाची आणखी एक कादंबरी वाचकाच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे आणि का नाही होणार? कारण लेखकाचं पुस्तक एक लेकरु असतं व ते लेकरु जेव्हा जन्मास येतं. तेव्हा आनंद होणारच. असा आनंद की ज्याचं मोजमाप करताच येत नाही. सध्याचा काळ ऑनलाईन काळ आहे व मी वाचकांना जास्तीत जास्त ऑनलाईन स्वरुपात पुस्तका उपलब्ध करुन देतो. मी वाचकांसाठीच लिहितो. कारण वाचक मला फोन करतात. म्हणतात की सर, आपली नवीन पुस्तक लिहिली असेल तर पाठवा. मी त्यावर त्यांची इच्छा पुर्ण करीत त्यांना गुगलवर ऑनलाईन पुस्तक उपलब्ध करुन देतो.