जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक संस्थांपैकी एक असलेल्या ब्लॅकरॉकमध्ये सध्या आर्थिक धक्का बसला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध The Wall Street Journalने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅकरॉकच्या Private Credit विभागाला भारतीय वंशाचे उद्योजक बंकिम ब्रह्मभट्ट यांनी तब्बल ५०० दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच जवळपास ४,००० कोटी रुपये इतकं नुकसान केलं आहे. या प्रकरणामुळे जागतिक वित्तीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, भारतातील लाखो गुंतवणूकदारांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.ब्रह्मभट्ट यांनी ब्लॅकरॉकच्या HPS Investment Partners आणि इतर काही बँकांना उच्च परताव्याचे प्रलोभन देत निधी उभारला होता. त्यांनी सादर केलेले प्रकल्प आणि कागदपत्रे विश्वासार्ह दिसत असली तरी चौकशीत हे सर्व व्यवहार बनावट निघाले. काही व्यवहारांमध्ये निधी शेल कंपन्यांच्या खात्यांत वळवण्यात आला आणि