भाग - १०(बँकेतील प्रसंग - सगळे काम करत बसले होते,)...शिवम- काय ग सावी आज अर्जुन सर आले नाहीत? सावी - माहिती नाही मला सुद्धा,शिवम - तुला माहिती नाही म्हणजे आश्चर्य आहे.. सावी- म्हणजे? काय म्हणायचंय तुला शिवम (तिरप्या नजरेने पाहताना..)शिवम - अग सगळ्या ऑफिस ला माहिती आहे, म्हणजे असं म्हणतात हो बाकीचे लोक कि तुझं आणि अर्जुन सरांचं....... (बोलताना मधेच थांबला)अंजली - ओय काय बोलतोयस शिवम? कान फोडेन तुझा आता....सगळा ऑफिस काहीही बोलूदे आपल्याला सावी वर विश्वास आहेच ना... (त्याच्यावर आवाज चढवताना म्हणाली..)सावी - अंजली ताई, शांत हो...शिवम लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐक..डोळ्यांनी पाहिलंस का तू? अंजली - नाहीतर काय मूर्खपणा करतोय...चल निघ इकडून.... शिवम