टॅरिफच्या सावटाखाली जग, भारत ठरतोय स्थैर्याचा आधार

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच चीनवर मोठा आर्थिक आघात करत सर्व चिनी वस्तूंवर 100 टक्के आयातशुल्क म्हणजेच टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा परिणाम तात्काळ वॉल स्ट्रीटवर दिसला आणि अमेरिकन बाजारातून तब्बल दीड ट्रिलियन डॉलर्सची घसरण झाली. गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली असून हा निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेसाठी नवीन संकटाची सुरुवात ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. ट्रम्प यांचा उद्देश अमेरिकन उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा आणि चीनवर आर्थिक दबाव आणण्याचा असला तरी या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. याचवेळी मध्यपूर्वेत गाझा संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझावरील सुरक्षा बैठक अर्धवट ठेवून भारताचे पंतप्रधान