परमेश्वराशी अनुसंधान

               "परमेश्वराशी अनुसंधान"   परमेश्वराशी अनुसंधान ठेवणे आवश्यक आहे. परमेश्वरावर आपला दृढ विश्वास हवा. त्या परमेश्वराच्या चैतन्याचा स्पर्श व्हावा ही आस मनात बाळगावी. तो परमेश्वर आपल्या निकटच असतो. फक्त त्याला रामनामातून सतत साद घालणं मात्र आवश्यक असतं. नामसाधनेच्या महत्त्वात समर्थ तल्लीन होऊन गात राहातात, त्यांचं वास्तविक तेच कारण असतं. भक्ताच्या हृदयातल्या नामस्मरणाच्या घंटा सतत निनादत राहाव्या लागतात. हा मनुष्यजन्म पूर्वसुकृताने लाभला आहे. त्या मनुष्यजन्माचे सार्थक नामसाधनेत साठलेले आहे याची जाणीव सतत होणे आवश्यक आहे. समर्थ आपल्या मनाला ही देवजाणीव सतत करून देतात. इतर प्राणीसृष्टीला परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव अजिबात नाही. परंतु माणसाला मन आहे. आपल्या