संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचा कायम सदस्यत्वाचा प्रयत्न - वास्तव आणि मर्यादा

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर कायम सदस्यत्व आणि व्हेटो अधिकार मिळवण्याची भारताची मागणी नवी नाही. गेल्या अनेक दशकांपासून भारत या दिशेने प्रयत्नशील आहे. लोकसंख्येच्या, अर्थव्यवस्थेच्या आणि शांतता राखीव दलांतील योगदानाच्या दृष्टीने भारताचे स्थान निश्चितच अग्रस्थानी आहे. तरीही प्रश्न असा निर्माण होतो की, एवढ्या दीर्घ प्रयत्नांनंतरही भारताला हे स्थान का मिळत नाही? उत्तर साधं आहे, या खेळात न्याय किंवा पात्रता नव्हे, तर सत्ता आणि सामरिक हितसंबंध चालतात. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सध्याचे पाच कायम सदस्य म्हणजे अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम हे “P5” म्हणून ओळखले जातात. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या या व्यवस्थेत त्यांना व्हेटोचा अधिकार देण्यात आला. या व्हेटोमुळेच