वाखान ते चाबहार- भारताचे गुप्त अस्त्र?

भारताने गेल्या काही आठवड्यांत परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर केलेल्या काही हालचालींनी दक्षिण आशियातील राजकीय वातावरण हलवून सोडले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी यांची भेट घेतली. वरकरणी ही भेट मानवी मदत, शिक्षण आणि व्यापार या विषयांवर केंद्रित असल्याचे सांगण्यात आले, परंतु तिचा खरा अर्थ या सीमित चौकटींपेक्षा फार मोठा आहे. ही भेट भारताच्या दीर्घकालीन सामरिक रणनीतीचा भाग असल्याचे आता स्पष्टपणे दिसून येते. या भेटीनंतर आंतरराष्ट्रीय वृत्तमाध्यमांत आणि विश्लेषक वर्तुळात असे ठळकपणे चर्चिले जात आहे की भारताने पाकिस्तानभोवती एक प्रकारे रणनीतिक जाळे विणले आहे. वाखान कोरिडॉर, चाबहार बंदर आणि ताजिकिस्तानमधील हवाई सहकार्य या तीन बिंदूंमुळे भारताने पाकिस्तानला