तोतया - प्रकरण 10

प्रकरण 10बाहेर साक्षात प्रखर मार्तंड प्रजापती उभा होता !***हा माणूस माझ्या कडे येईल अशी कधीच मी अपेक्षा केली नव्हती.“ हाय, चंद्रहास, तू या वेळी जागा आहेस? तुला डिस्टर्ब नाही ना केलं?” त्याने विचारलं. मी त्यांच्याकडे निरखून पाहिलं.त्यांचे हात थरथरत होते.मला जरा ते आजारी वाटले, पण त्यांना तसं भासवू न देता मी म्हणालो,“ छे, छे. मला आनंदच झाला उलट. पण तुम्ही का आलात इथे? मला निरोप पाठवला असता तर मीच आलो असतो.” मी म्हणालो.“ बस.मला तुझ्याशी खाजगी बोलायचं होतं जरा.” प्रजापती म्हणाले.मी अस्वस्थ झालो जरा.यांना काय बोलायचं असेल?“ कसं चाललंय तुझं आयुष्य?” प्रजापतीने विचारलं. जगातला दोन नंबरचा श्रीमंत माणूस माझ्या शेजारी बसून