तोतया - प्रकरण 9

प्रकरण 9सर्वात प्रथम मी बँकेत फोन लावला आणि त्यांना सांगितले की मला पैसे काढायचे आहेत तर माझ्या खात्यात जमा असणाऱ्या पस्तीस हजार पैकी पंधरा हजार इथल्या दुबई शाखेत त्यांनी वर्ग करावेत. पंधरा वीस मिनिटात ते जमा झाले आणि मी बँकेत जाऊन रक्कम काढली.या सर्वातून हे लक्षात आले की प्रजापती ने त्याचा शब्द पाळला होता, मला कुठेही फोन करता येईल, बाहेर जाता येईल असं तो म्हणाला होता, तसं खरंच झालं होतं.माझ्या होकाराची वाट न बघता त्याने ही व्यवस्था केली होती.मला उद्या नवीन कपडे आणि इतर गोष्टी खरेदीसाठी ही रक्कम लागणार होती.बरोबर पावणेसहा वाजता मी प्रजापतीला भेटायला गेलो. बाजूला भालेकर होता. माझा