तोतया प्रकरण 8दिवसा पळून जायचं तर मला पहारेकर्यांना चकवा देता आला पाहिजे. प्रजापतीचा मास्क घालून मी तो सहज देऊ शकत होतो फक्त त्यावेळी मजहर तिथे असता कामा नये एवढीच काळजी मला घ्यायची होती मी ठरवलं की काहीतरी निमित्त काढून बाजूला खाली घेऊन जायचं. बंगल्याच्या खालच्या गॅरेजमध्ये जग्वार, रोल्स राईस आणि मर्सिडीज अशा तीन गाड्या होत्या. कुठल्या गाडीने पळून जाणं जास्त सोयीस्कर आहे असा विचार माझ्या मनात आला..मजहर आत आला. मी त्याला काल दिलेल्या बातमीचा त्याच्यावर काय परिणाम झाला असेल याचा अंदाज घ्यायचा मी प्रयत्न केला पण तो फारसे काही बोलला नाही. “अर्ध्या तासात आपण निघतो आहोत.” तो म्हणाला आणि आतल्या कपाटात