मी आणि सांगण्या सारखे बरचं काही

मी आणि सांगण्यासारखे बरेच काही -भाग २वाचन, सिनेमा आणि आठवणींची दुनियाआधीच्या लेखात मी सांगितले होते की त्या काळात पत्रलेखनाचे विषय सिनेमे, वाचन, बिंदू चौकातील सभा, खासबागेतील कार्यक्रम अशा गोष्टींवर आधारित असायचे. मात्र एक गोष्ट सांगायची राहिलीच — आम्ही कॉमर्स आणि लॉचे विद्यार्थी असल्यामुळे आमच्या पत्रांत त्या काळातील इंग्रजी भाषेचा, कधी कधी पद्यरचनेचा, आणि कॉमर्सच्या भाषेचा छटा असायचा.वाचनाचा विषय निघालाच आहे तर ‘कनवामं’ म्हणजेच करवीर नगर वाचन मंदिर याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. शाळेत जाताना रोज जसे तिथे पाय वळायचेच, तसेच रविवारीही ते ठिकाण ओढ लावत असे. जुन्या इमारतीत प्रशस्त वाचन हॉल, वर्तमानपत्रांची रांग, आणि पुस्तकांनी भरलेले कपाट — हे सर्वच