********११******************** रामानं सुलोचनेला जायची आज्ञा देताच ती निघाली. तशी ती लंकेत पोहोचली व रितीरिवाजानुसार तिनं आपल्या पतीचं मस्तक कवेत घेतलं व ती त्या पतीच्या मस्तकासह सती गेली होती. त्यातच सती जातांना तिला भयंकर वेदना होत होत्या. परंतु त्या सगळ्या सहन करुन ती राक्षस जातीतून मुक्त होत होती. पुन्हा राक्षसजातीत कधीच जन्म न घेण्यासाठी. मंदोदरीला आठवत होता सुलोचनेचा सती जाण्याचा प्रसंग. ती सती गेली होती या जगतातील रितीरिवाजाच्या दूर. जो समाज विधवेला दुःख देत होता. त्या दुःखापासून कितीतरी दूर. तशी लंकेतील प्रजा मंदोदरीला डोक्यावर घेवून होती तर काही शहाणे लोकं तिला दुषणेही