तोतया प्रकरण 7रात्री मला नीट झोप लागली नाही. माझ्या मनात विचार आला समजा प्राशिलाचा खून करण्यासाठी मालविकाने मजहरला पटवलं तर? मला प्राशिलाला सांगावं लागेल की मालविका ने प्रजापतीशी लग्न केलेलं नाही आणि खोटा लग्नाचा दाखला आणि मृत्युपत्र तयार करण्यासाठी ती मला पटवते आहे. समजा मी प्राशिलाला हे सगळं सांगितलं तर काय होईल? माझ्या हातात एक हुकमाचं पान घेईल. पुढच्या कुठल्याही कागदपत्रावर मी सही करणार नाही असा स्पष्ट नकार मी देऊ शकेन. नंतर माझ्या मनात भालेकर बद्दल विचार आला. तो फार क्रूर होता. तो मला बळजबरी करू शकेल का सह्या करण्यासाठी? त्याला गरज होती म्हणून तो मला ठार मारणार नाही पण