तोतया प्रकरण 6मी पुन्हा सावध झालो माझ्या सह्या त्या खोट्या मृत्युपत्रावर केल्यानंतर मला दोन कोटी मिळतीलच याची काय खात्री होती? शिवाय मी प्रखर प्रजापतीचा तोतया म्हणून होतो. प्रखरच्या मृत्युपत्रानंतर माझं अस्तित्वच संपणार होतं. मी तिच्याकडून आणखीन काही माहिती काढायचं ठरवलं कारण मला माझा निर्णय लगेच द्यायचा नव्हता मी तिला विचारलं,“ तू म्हणतेस त्याला पुरावा काय?”“ कशाचा?” तिने विचारलं.“ म्हणजे प्रखर प्रजापती तू म्हणतेस तसा दोन वर्षापासून आजारी आहे. बिछान्यातून उठू शकत नाही याला काय आधार आहे तुझ्याकडे?”“तसा पुरावा आहे, प्रखर चे स्टेट बँकेत फोर्ट मुंबई आणि दुबई बँकेत जे वैयक्तिक खाते आहे त्यावर व्यवहार करणे प्रखर ला शक्य नव्हते, तेव्हा त्याने