तोतया प्रकरण 5प्रकरण ५ रात्री माझ्या बेडवर मालविका आल्याचं स्वप्न मला पडलं मी चमकून जागा झालो रात्रीचे सव्वातीन वाजले होते झोपेच्या अंमला मधून मी जागा झालो तेव्हा मला लक्षात आलं की ते स्वप्न नव्हतं. “तू खूप छान आहेस. ‘सर्वच’ बाबतीत” ती म्हणाली. “तू सुद्धा तशीच आहेस” मी म्हणालो “भालेकर तुझ्यावर खूप खुश आहे. तो म्हणत होता की तुला फोनवरील संभाषण खूप छान प्रकारे करता आलं.” मालविका म्हणाली.“मी मुळात अभिनेता आहे मालविका आणि हा अभिनय करण्यासाठीच मला इथे आणलं गेलंय. चक्क भाड्याने घेतलं गेलंय.” माझ्या बोलण्यात नकळत कटूता आली. “प्रखर ची परिस्थिती आणखीनच खराब झाल्ये, आज त्यानं मला ओळखलं पण नाही” मी किंचित सावध झालो. ही माझ्यावर