तोतयाप्रकरण २ मला तिथेच थांबायला सांगून तो गोरिलाला घेऊन बाहेर गेला. थोड्या वेळात मला गाडीत नेऊन बेशुद्ध करणारी म्हातारी बाई तिथे आली.तिच्या हातात तो छोटा कुत्रा होता.माझ्याशी असं वागल्या बद्दल ती माफी मागायला आली होती.“ तुझी आई हयात आहे?” अचानक तिने मला प्रश्न विचारला आणि मी हादरलोच.“ का? असं काय विचारताय?” मी विचारलं.“ सांग तर ”“ नाही ती पाच वर्षांपूर्वीच गेली.”“ ती जिवंत असती तर मी आज तुझ्या बाबत जे केलं तेच केलं असतं. आम्ही तुला ज्या माणसाचा तोतया व्हायला सांगतोय तो माझा मुलगा आहे.”“ माझ्या आईने असं कुणालाच बेशुद्ध करून पळवलं नसत.उगाच तिच्याबाबत वाईट बोलू नका.” मी भडकून म्हंटलं.“ संकटं