तोतया - प्रकरण 4

तोतयाप्रकरण 4 मी भालेकरवर कडाडल्यावर त्याचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता.रागाने लालेलाल झाला. मजहर माझ्या मागे होता त्यामुळे त्याचा चेहेरा दिसला नाही पण त्याला ही आश्चर्य वाटलं असावं, पण भालेकरला मी ओरडल्यामुळेत्याला मनातून आनंद झाला असावा. भालेकर माझ्यावर काहीतरी ओरडणार होता पण मालविकाने त्याला हाताने खूण करून गप्प राहायला सांगितलं. ते दोघं निघून गेले आणि खोलीत आम्ही दोघंच होतो.तिने माझ्याकडे निरखून पाहिलं जणूकाही माझा अभ्यास केला आणि म्हणाली,“ तुझा मास्क काढून टाक.तू कसा आहेस मला बघायचंय.” मी बाथरूम मधे जाऊन मास्क काढला.बाहेर आलो.मी टेबलाजवळ उभा होतो आणि ती माझ्याकडे बघत होती.खाटिक जसा त्याच्या समोरच्या प्राण्याकडे बघेल तशी नजर वाटली मला.“ बस खाली.”