तोतया - प्रकरण 3

  • 174
  • 66

तोतया प्रकरण ३आज तिसरा दिवस..दुपारी मजहरने जेवण आणलं तेव्हा मी सह्या करत बसलो होतो. माझी सहीवर आता हुकुमत आली होती. येतांना त्याने माझा तिसरा हप्ता आणला होता.पाच हजाराचा ड्राफ्ट ! मला आता बाहेर नेण्यात येणार होतं.माझी तोतयेगिरी आता सुरु होणार होती. भालेकर आत आला त्याच्या हातात ब्रीफ केस होती.त्यातून एक लीगल पेपर बाहेर काढला. हिरवट रंगाचा. त्यावर काहीतरी मजकूर छापला होता.“ यावर पेन्सिल ने सही कर.”मी हातात पेन्सिल घेऊन अस्खलित पणे प्रखर प्रजापती ची सही ठोकली.भालेकर माझ्याकडे बघत होता.माझा आत्मविश्वास पाहून तो खुष झाला.“ आता पेनाने कर.” तो म्हणाला. मी केली. ती नीट निरखून पहात तो म्हणाला, “ पास झालास तू चक्रपाणी,