प्रकरण १मागचा पूर्ण आठवडा मी अत्यंत कंटाळलेल्या अवस्थेत आणि छताकडे बघत घालवला होता.खिशात पैसे नाहीत, नोकरी नाही,काम नाही अशा स्थितीत. माझ्या जवळचा फोन हा एकमेव सोबती आणि आधार होता. एवढ्यात फोन वाजला.“ मी प्रीतम कपूर ची सेक्रेटरी रुधिरा बोलत्ये.”रुधिरा माझी मैत्रीण. आत्ताची की भूत काळातली? मी मनाला विचारलं.“ कशी आहेस रुधिरा?”“ प्रीतम कपूर ना तुम्हाला तातडीने भेटायचंय. येताय असं गृहीत धरू ना मी?” कोणतीही वैयाक्तीक ओळख असल्याचं न दाखवत तिने विचारलं.“ तातडीने म्हणजे नक्की कधी? ”“ जेवण झाल्यावर.साधारण ३ वाजता दुपारी.”“ मी प्रीतम कपूर यांना काही रक्कम देणे लागतो.त्याच्या वसुलीसाठी नाही ना बोलावलंय?” मी विचारलं“ जॉब बद्दल आहे.” रुधिरा म्हणाली.मला