ढाका आंदोलन आणि मोहम्मद युनूस : आशेपासून निराशेपर्यंतचा प्रवास

  • 327
  • 90

बांगलादेशमधील राजकारण आणि समाज जीवनात गेल्या वर्षभरात घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बदलाची. दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या शेख हसीना यांच्या सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी दिलेल्या मोठ्या आंदोलनामुळे देशात राजकीय उलथापालथ झाली. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि सर्वसामान्य जनतेने भाग घेतला. त्यांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि राजकीय दडपशाहीविरोधात आवाज उठवला. या संघर्षातून हसीना सरकारला गादी सोडावी लागली आणि त्यानंतर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्याकडे तात्पुरते प्रशासन सोपवले गेले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना आणि आंदोलनकर्त्यांना वाटले की, आता देशात पारदर्शकता, लोकशाही आणि नवा बदल होईल. पण काही महिन्यांतच परिस्थिती पूर्णपणे उलटी झाली. युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अंतरिम सरकारकडून