पणती

  • 183
  • 63

आज पुन्हा ऑफिसमधून यायला उशीर झाला होता. बाहेर सगळीकडे दिव्यांची रोषणाई आणि लाइटिंगमुळे दिवाळीचं एकदम आनंददायी वातावरण झालं होतं.पण मी मात्र “उद्या परत ऑफिसलाच जावं लागणार” या विचारात बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. मोबाईलच्या स्क्रीनकडे बघतच रूमच्या दिशेने निघालो आणि रागाच्या भरात दरवाजा जोरात ढकलून दिला.सोफ्यावर बसलो आणि मनात एकच विचार आला — कशाला आलो एवढ्या लांब?ही पहिलीच दिवाळी होती की सोबत कोणीच नव्हतं — अगदी बोलायलासुद्धा कोणी नव्हतं.दुबईत येऊन फक्त तीन महिने झाले होते आणि त्यामुळे सगळंच नवीन — ऑफिस, घर, आणि शेजारीदेखील ओळखीचे नाहीत.बिल्डिंगमध्ये फक्त आमचा सिक्युरिटी गार्ड “जेकब” एवढाच एक चेहरा ओळखीचा होता. तो दक्षिण भारतातील असल्यामुळे आम्हा दोघांमध्ये